बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या १ हजार ८४६ जागांसाठी भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या १ हजार ८४६ जागांसाठी भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध

बृहन्मुंबई महानगरपालिका

जनसंपर्क विभाग

दिनांक २२ सप्टेंबर २०२४

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या १ हजार ८४६ जागांसाठी भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध

दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द

पदवी परीक्षेत ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण यातील ‘४५ टक्के गुण’ ही अट देखील रद्द

दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत

यापूर्वी प्रसिद्ध जाहिरातीनुसार परीक्षा शुल्क भरुन अर्ज केलेल्या अर्जदारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही

https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर जाहिरातीमध्ये दिलेल्या लिंकवरून (यूआरएल) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी ‘माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ ही शैक्षणिक अर्हता लागू होती. तथापि, त्यातील ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरांवरुन करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द केली आहे. त्याचप्रमाणे, पदवी परीक्षेत ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण यातील ‘४५ टक्के’ ही अट देखील रद्द करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर, आता सुधारित अर्हतेनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवीन जाहिरातीनुसार, दिनांक २१ सप्टेंबर २०२४ पासून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

दरम्यान, यापूर्वी प्रसिद्ध जाहिरातीनुसार परीक्षा शुल्क भरुन अर्ज केलेल्या अर्जदारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावरील किंवा https://bit.ly/3XxQNli या लिंकवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. २५,५००-८१,१०० (पे मॅट्रिक्स-एम १५) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती (१४२), अनुसूचित जमाती (१५०), विमुक्त जाती-अ (४९), भटक्या जमाती-ब (५४), भटक्या जमाती-क (३९), भटक्या जमाती-ड (३८), विशेष मागास प्रवर्ग (४६), इतर मागासवर्ग (४५२), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (१८५), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (१८५), खुला प्रवर्ग (५०६ ) याप्रमाणे रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. तसेच या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये समाविष्ट आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर पदासाठीची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तींसह प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक (यूआरएल) देण्यात आली आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येईल. दिनांक २१ सप्टेंबर २०२४ पासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ११.५९ मिनिटे वाजेपूर्वीपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल.

उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. तसेच त्यांचे काटेकोरपणे पालन करुन विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज विहित वेळेत सादर करावा. तसेच भरलेल्या संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी ९५१३२५३२३३ हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात येत आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान (दुपारी १.३० ते २.३० वाजेदरम्यानचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

हे दोस्तों, मेरा नाम सोनाली फुगे हैं| में इस ब्लॉग shonali18.com की फाउंडर और सीनियर एडिटर हूँ। मैं By Profession Teacher हूँ और By Passion Youtube Videos ,डिजिटल मार्केटिंग और ब्लॉग्गिंग करती हूँ जो की मेरा शौक है।मेरे शौक के बारे में – मुझे सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, इंटरनेट, कंप्यूटर ,सरकारी योजना और जॉब की information देने में रुचि है। मैं हमेशा कुछ नया सीखने की कोशिश करती हूं, क्योंकि अगर आपके पास ज्ञान है तो आप कुछ नया कर सकते हैं।“Success की सबसे खास बात है की, वो मेहनत करने वालों पर फ़िदा हो जाती है।” “मंज़िल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान हो

Leave a Comment

Affiliate Disclosure – Some links on this site are Amazon associate links. As an Amazon Associate https://shonali18.com may earn from qualifying purchases.
Note – Amazon, Amazon Prime, the Amazon Logo and Amazon Prime logo are trademarks of Amazon.com,Inc or its affiliates.